गावाविषयी माहिती

डाहे/ दहिवली कुंभिस्ते गाव हे महाराष्ट्र राज्यातील पालघर  जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. डाहे/ दहिवली कुंभिस्ते  गावात निळकंठेश्वर व गावदेवी मंदिर, श्रीराम मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पूर्वीपासून गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २०१०  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 5, अंगणवाडी केंद्रे ९ व व्यायामशाळा १, सभामंडप-3,  प्राथमिक उपकेंद्र- १ अशी शैक्षणिक, आरोग्य  व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये बहुतांश पाड्यात लघुनलयोजना द्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे, तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तांदूळ, हरभरा, उडीद, मुग, तूर  ही प्रमुख पिके घेतली जातात.

डाहे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डाहे गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८  सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

डाहे गाव आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

डाहे हे गाव वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावातील बहुतांश क्षेत्र हे लागवडी खालील असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ३५८ पेक्षा अधिक कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २०१०  आहे. त्यामध्ये १०५०  पुरुष९६० महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.  येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३५°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २०°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी १४५० Mm पर्जन्यवृष्टी होते.

लोकजीवन

डाहे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून तांदूळ, हरभरा, उडीद, तूर, मुग हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

डाहे गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या २०१०
पुरुष १०५०
स्त्री ९६०
एकूण २०१०

संस्कृती व परंपरा

डाहे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात श्री रामनववी ला रामाची पालखी हि चैत्र मध्ये मोठ्या उत्साहात  काढली  जाते त्यात प्रामुख्याने पालखी काढून मिरवणूक सोहळा हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे डाहे गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

विठ्ठल रुख्मिणी मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील मंदिर आहे.

शेती क्षेत्र – डाहे  येथे आंबे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेती आणि भात  शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

डाहे गाव तसेच दहिवली कुंभिस्ते गाव वाडा  तालुक्यातील पूर्वेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

वाडा, कुडूस  यासारखी बाजार्पेठेसारखी मोठी हि गावे आसपासची प्रमुख गावे आहेत.