गावाविषयी माहिती
डाहे/ दहिवली कुंभिस्ते गाव हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. डाहे/ दहिवली कुंभिस्ते गावात निळकंठेश्वर व गावदेवी मंदिर, श्रीराम मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पूर्वीपासून गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २०१० आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 5, अंगणवाडी केंद्रे ९ व व्यायामशाळा १, सभामंडप-3, प्राथमिक उपकेंद्र- १ अशी शैक्षणिक, आरोग्य व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये बहुतांश पाड्यात लघुनलयोजना द्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे, तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तांदूळ, हरभरा, उडीद, मुग, तूर ही प्रमुख पिके घेतली जातात.
डाहे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डाहे गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
डाहे गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.